व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात आपण नेहेमी “रिकव्हरींग अॅडिक्ट” असंच म्हणत असतो. आपण कधीही “कायमचा व्यसनमुक्त” असे शब्द वापरत नाही. कारण व्यसनमुक्ती ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. जेव्हा एखादा व्यसनी रुग्णमित्र उपचारकेंद्रात दाखल होतो तेव्हा त्याने हे लक्षात घेणे आवश्यक आहे की तेथे केले जाणारे महिन्याभराचे उपचार ही केवळ सुरुवात असते. पुढे दीर्घकाळ त्यावर काम करायचे असते. अशावेळी ज्यांना व्यसनमुक्तीकेंद्रातून उपचार घेऊन आपण बाहेर पडलो म्हणजे आपण कायमचे व्यसनमुक्त झालो असे वाटते त्यांना अतिआत्मविश्वास असण्याची शक्यता असते.
कायमचे बरे होणे याचा अर्थ आता आपल्याला कधीही व्यसनाचा मोह होणार नाही ही एक समजूत, किंवा आता कधीतरी थोडीशी घेतली तरी फारसा फरक पडणार नाही ही दुसरी समजूत. अशा गोष्टी डोक्यात येऊ लागल्या म्हणजे पुढे घसरगुंडी अटळ असते. म्हणूनच व्यसनमुक्तीच्या वाटेवर चालताना दीर्घकाळ स्वभाव दोषांवर काम करावे लागणार आहे. आयुष्यात झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. अशा अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. तेथे घाई करून चालत नाही. व्यसनमुक्तीमध्ये पटकन रिझल्ट मिळणे नसते. आणि तशी अपेक्षाही करण्यात अर्थ नसतो. व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेला पुरेसा वेळ द्यावा लागतो.
अतिआत्मविश्वासाच्या अशा आणखी काही लक्षणांवर आपण पुढे बोलुयात. तोपर्यंत मंडळी फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
आपला
अतुल ठाकुर
धन्यवाद 🙂









