आपण अतिआत्मविश्वासाबद्दल बोलत आहोत. एका टप्प्यावर जेव्हा व्यसनापासून दूर राहून काही काळ लोटतो तेव्हा अतिआत्मविश्वास असलेल्या माणसाला फॉलोअप मिटिंगचे महत्व वाटेनासे होऊ शकते. खरं तर असं एक निरिक्षण आहे की ज्यांचा फॉलोअप नियमित असतो त्यांचे स्लिप आणि रिलॅप्सचे प्रमाण कमी असते.
पण मनात येऊ लागते आपल्याला तर सर्व माहित आहे. आपण सर्व काळजी घेत आहोत. नेहेमी तेच तेच शेयरींग काय ऐकायचे? असे विचार हा धोक्याचा कंदिल समजावा. फॉलोअपमधील शेयरींग काहीवेळा तेच ते असले तरी ते कानावर पडणे इष्ट असते अशी माझी समजूत आहे. त्यामुळे आपण सावध राहतो.
शिवाय अनेकदा तेच ते शेयरींग असते हे ही तितकेसे बरोबर नाही. वेगळे रुग्णमित्र वेगळ्या दृष्टीकोणातून बोलत असतात. त्यातून आपल्याला काही प्रेरणा मिळू शकते.
पुढे जाण्याआधी आपण फॉलोअपबद्दल थोडीशी चर्चा करुया. तोपर्यंत मंडळी फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे हे लक्षात ठेवा.
आपला
अतुल ठाकुर









