फक्त आजचा दिवस – ८५ – अतिआत्मविश्वास निर्माण कसा होतो?

अतिआत्मविश्वास हा व्यसनाआधी माणसाच्या स्वभावाचा भाग असण्याची शक्यता असते. अनेकांकडून असे ऐकले आहे की फुशारक्या मारणारी, तथाकथित डॅशिंग स्वभावाची माणसे व्यसनी बनण्याची शक्यता जास्त असते. आपल्याला सारे काही माहित आहे. आपल्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. आपल्याला कुणाचे काही ऐकण्याची गरज नाही या सर्व अतिआत्मविश्वासाच्याच छ्टा आहेत. मात्र व्यसनमुक्तीच्या वाटेवर चालताना आपण नम्र राहिलो नाही तरी अतिआत्मविश्वास निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

व्यसनातून बाहेर येण्यासाठी माणसाला खुप प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर सोबर राहणे हे देखिल सतत चालणारी प्रक्रिया असते. अशावेळी एका टप्प्यावर “हे सारे प्रयत्न आपण केले. यशस्वी झालो. आपण व्यसनमुक्त राहण्यासाठी बरेच काही केले.” अशासारखे विचार मनात येऊ शकतात. असे विचार मनत आल्यास आपण इतरांपेक्षा वरचढ आहोत ही भावना मनात येण्यास वेळ लागत नाही.

त्यामुळे आपल्या भावना, आपल्या मनात येणारे विचार आपल्याला लक्षपूर्वक पाहणे आवश्यक आहे असे मला वाटते. अतिआत्मविश्वास ही भावना व्यसनमुक्तीच्या मार्गातील एक मोठा धोंडा आहे जो आपल्याला दूर सारूनच पुढे जावे लागते.

आपला
अतुल ठाकुर
२४ नोव्हेंबर  २०२०
फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...