फक्त आजचा दिवस   – ८७ – उपचारकेंद्रात आल्यावर

ज्यांना आपण घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून आपल्याला येथे यावं लागलं असं वाटतं अशी माणसं उपचारकेंद्रात आल्यावर उपचारांमध्ये मनापासून सहभागी होत नाहीत हे आपण पाहिलं पण असंही असु शकतं  की जी माणसं स्वतःच्या मनाने आली आहेत त्यांच्याही मनात काही दिवसांनी “आपल्याला खरोखर येथे येण्याची, राहण्याची, उपचार घेण्याची गरज आहे का?” असे विचार येऊ शकतात. याला कारण आहे.

अनेकदा माणसाने व्यसनात रॉकबॉटम गाठलेला असतो. घरचे वैतागलेले असतात. त्रासलेले असतात. काय करु नि काय नको असं सर्वांना होऊन गेलेलं असतं. कौटूंबिक स्वास्थ्य तर हरवलेलंच असतं पण आर्थिक परिस्थितीही खालावलेली असते. अशावेळी सर्वांनाच व्यसनी व्यक्तीने उपचारकेंद्रात दाखल होऊन उपचार घ्यावेत असं वाटतं. त्याप्रमाणे माणसे व्यसनी व्यक्तीला उपचारकेंद्रात दाखल करतातही.

पण उपचारकेंद्रात दाखल झाल्यावर काही दिवसांनी परिस्थितीचा ताण कमी होतो. मग एकदा ही निकडीची अवस्था संपली कि मनात हे विचार डोकावू लागतात की आपल्याला खरं तर उपचारकेंद्राची गरजच नव्हती. एकदा असे विचार मनात यायला लागले की पुढे उपचारांमध्ये भाग घेणे कठीण होऊ लागते. अतिआत्मविश्वासाची ही आणखी एक छ्टा आहे.

आपला
अतुल  ठाकुर
२६ नोव्हेंबर   २०२०
फक्त आजचा दिवस  आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...