फक्त आजचा दिवस  – ८९ – सोबराईटीतील प्रांजळपणा

प्रांजळपणा,  प्रामाणिकपणा, नम्रपणा किंवा पाय जमिनिवर राखण्याची सवय या सार्‍या गोष्टी सोबराईटी  टिकवण्यासाठी आवश्यक आहेत अशी माझी समजूत आहे कारण त्या अतिआत्मविश्वासाला प्रतिबंध  करतात. अनेकदा माणसे दुसरं टोक गाठतात. अतिआत्मविश्वास वाईट मग आम्ही  काय सतत पुढे काय घडेल, सोबराईटी टिकेल की नाही याच चिंतेत राहायचं की  काय? मूळात आपले पाय जमिनीवर असले तर सतत चिंतेत राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण  जेव्हा आपण यशाच्या शिखरावर आहोत असं वाटतं तेव्हा पुर्वीचे दिवस आठवून बेसावध  राहु नये इतकाच मुद्दा आहे.

मला अनेकदा  वाटतं अतिआत्मविश्वासाला डिवचणार्‍या इतरही गोष्टी असु शकतात. कदाचित जुने व्यसनी  मित्र तुम्हाला हरभर्‍याच्या झाडावर चढवून तुमची मजा पाहण्याचा प्रयत्न करु शकतात.  तुमच्या नेहेमीच्या दारु पिण्याच्या जागा तुम्हाला खुणावू शकतात. होळी,  गटारी सारखे सण तुम्हाला व्यसनाकडे जायला मोहात पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  मित्रांच्या, ऑफीसमधल्या पार्ट्यांमधले वातावरण तुम्हाला भूल पाडू शकते. याचं  कारण तुम्ही जरी व्यसनमुक्तीच्या वाटेवर चालु लागला असलात तरी जग तेथेच असते आणि  तुमच्या आजुबाजुची माणसेही तशीच असतात.

अशावेळी पाय  जमिनीवर असले की काम सोपे होऊ शकते आणि अतिआत्मविश्वास असेल तर काम बिघडू शकते हे  लक्षात घेणे आवश्यक आहे.

आपला
अतुल   ठाकुर
२८ नोव्हेंबर   २०२०
फक्त आजचा दिवस   आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...